
सुंदर टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे. "कहता है दिल", "सीआयडी", "रेत", "वो रहने वाली महल की" सारख्या सर्व मालिकांमध्ये तिनं उत्तम काम केलं आहे. ज्यामुळे तिनं प्रेक्षकांच्या घरात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलते हे फार दुर्मिळ आहे. काम्यानं तिच्या पूर्वीच्या लग्नात खूप वाईट दिवस पाहिले होते, ज्यामुळे तिनं 2013 मध्ये हे नातं तोडलं आणि नंतर 2020 मध्ये शलभ डोंगशी लग्न केलं. आज ती खूप आनंदी आहे.

आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही फोटो दाखवतोय, हे फोटो पाहून तुम्हाला समजेल की काम्या पूर्वीसारखीच पुन्हा आनंदी दिसते.

2020 मध्ये काम्यानं शलभ डोंग याच्याशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. मात्र आज ती खूप आनंदी आहे.

लग्नानंतर ती आता पती शलभसोबत राहतेय. ती अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

काम्या पंजाबीचे असंख्य चाहते आहेत. तिची स्टाईल नेहमीच तिच्या चाहत्यांना वेड लावते.