
मिलिंद सोमण हे नेहमीच त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. आज मिलिंद सोमण यांचा 57 वा वाढदिवस आहे. मिलिंद त्यांच्या फिटनेसकडेही प्रचंड लक्ष देतात.

मिलिंदने 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरसोबत लग्न करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

मिलिंद हे नेहमीच आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. इतकेच नाही तर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 17000 फूट उंचावर जाऊन तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

मिलिंद सोमण यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

मिलिंद आपल्या चाहत्यांसाठी व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. मिलिंदची फॅन फाॅलोइंग देखील जास्त आहे.