
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज एक मोठं नाव आहे. तिची ओळख केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहे.

ती हॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये सतत काम करताना दिसते. मात्र तिच्या करियरची सुरुवात बॉलिवूडमधूनच झाली होती. प्रियांका चोप्रा आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

तिने 2002 साली तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. 'थामीजन' या चित्रपटाद्वारे तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. देसी गर्लनं गेल्या 19 वर्षात बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत अनेक काम केली आहेत. तिनं स्वत:साठी हॉलिवूडमधील पतीही निवडला आहे. 2018 मध्ये प्रियंका चोप्रानं निक जोनससोबत भारतात लग्न केले.

अक्षय कुमार : मात्र निक जोनसशी लग्न करण्यापूर्वी तिचे काही संबंध होते. ज्यामुळे ती बर्याचदा चर्चेतही होती. प्रियंका चोप्राचा 'ऐतराज' हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रियंकानं सुंदर काम केलं ज्यामुळे ती ए रात्रीत लोकांच्या नजरेत आली. या चित्रपटात अभिनेत्री अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. सोबतच या चित्रपटात करीना कपूर खान देखील होती. मात्र प्रियंकाचं नाव अक्षय कुमारशी जोडलं जाऊ लागलं. सोबतच या चित्रपटानंतर प्रियंका चोप्रा अक्षय कुमारसोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ज्यामध्ये अंदाज, वक्त सारख्या सिनेमांचा समावेश होता. मात्र जेव्हा दोघांबद्दल बातम्या समोर आल्या तेव्हा अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना मधे आली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ट्विंकल आणि प्रियंका चोप्रा यांच्यात जोरदार वाद झाला तेव्हा ट्विंकल खन्नानं सेटवर कॉल केला होता. यानंतर त्यांचे संबंध तुटले. दरम्यान, ही जोडी सलमान खानसोबत मुझसे शादी करोगीमध्ये दिसली.

शाहरुख खान : प्रियंका चोप्रासोबत शाहरुख खानचंही नाव जोडलं जातं. शाहरुख आणि प्रियंका चोप्राच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावरही चर्चेत आल्या. असं म्हणतात की डॉनच्या शूटिंगदरम्यान हे दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. पण जेव्हा या सर्व गोष्टी गौरीपर्यंत पोचल्या तेव्हा तिने प्रियंका चोप्राला आपल्या पतीपासून दूर राहण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनी कधी एकत्र काम केलं नाही.

याशिवाय प्रियंकानं शाहिद कपूर आणि हरमन बावेजा यांनाही डेट केलं आहे. या दोघांसोबत ती अनेकदा स्पॉट झाली, ज्यामुळे तिचं नाव बर्यापैकी चर्चेत आलं होतं. मात्र आता प्रियंका चोप्रा विवाहित असून न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली आहे.