
सैफ अली खानला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. तो आपल्या दमदार अभिनयानं चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. प्रत्येक चित्रपटात सैफची एक वेगळी स्टाईल पाहायला मिळते. सैफला त्याची खरी ओळख ‘ये दिलगी’ या चित्रपटातून मिळाली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज सैफ त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्याच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल सांगतोय.

सैफ अली खानने ‘हम तुम’ या चित्रपटातील अभिनयाने सर्वांची मने जिंकली. या चित्रपटासाठी सैफला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. या चित्रपटात सैफसोबत राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसली होती.

सैफ अली खानचा ‘परिणीता’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी त्याने शेखर रॉयची वेगळी व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटात सैफसोबत विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसली होती.

‘दिल चाहता है’ मध्ये सैफ अली खान सोबत आमिर खान आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील सैफच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. हा चित्रपट आजही प्रत्येकाची मने जिंकतो.

लव्ह आज कल या रोमँटिक चित्रपटातील सैफ अली खानची स्टाईल अनोखी होती. त्याच्या आणि दीपिका पदुकोणच्या जोडीने सर्वांची मनं जिंकली होती. सर्वांना हा चित्रपट खूप आवडला.

चित्रपट ओमकारामध्ये लंगडा त्यागीचं सैफ अली खानचं पात्र प्रेक्षकांच्या हृदयात बसलेलं आहे. हे पात्र साकारल्याबद्दल त्याचं खूप कौतुक झालं.

सैफ अली खाननं यावेळी त्याच्या नकारात्मक व्यक्तिरेखेनं सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. उदयभानसिंग राठोड हे पात्र प्रेक्षकांना चांगलंच आवडलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली.