
इशिता सोशल मीडियावर खूप फेमस आहे. विशेष म्हणजे तिच्या बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इशिता अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

इशिता राज शर्माला बॉलिवूडमध्ये तिच्या पहिल्याच चित्रपटातून ओळख मिळाली. 'प्यार का पंचनामा'मध्ये तिने दमदार आणि बोल्ड भूमिका साकारली होती. यानंतर तिला बॉलिवूडमध्ये एकामागून एक अनेक चित्रपट मिळाले.

इशिताचा जन्म जन्म 8 फेब्रुवारी 1990 रोजी मुंबईत झाला. तिने आपले शिक्षण दिल्लीत पूर्ण केले आणि नंतर ती इंग्लंडला गेली. त्यानंतर ती भारतात परतली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये नशीब आजमावले.

इशिताने 'प्यार का पंचनामा' चित्रपटानंतर मेरुतिया गँगस्टर्समध्ये काम केले. त्यानंतर तिला लव रंजनच्या 'प्यार का पंचनामा 2' मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

इशिता शेवटी 'जय मम्मी दी' मध्ये दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र सोशल मीडियावर ती चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.