
बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिने आज स्वत:च्या कलेने आपले नाव कमावले आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे.

डान्सर आणि अभिनेत्री असणाऱ्या नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तिची स्टाईल पाहताच तिचे चाहते मंत्रमुग्ध होतात. हार्डी संधूच्या ‘नाह’ (Naah) या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये जोरदार एंट्री केली. या गाण्यातील नोराच्या अदा पाहून प्रत्येकजण तिचा दिवाना झाला.

नोरा प्रचंड सुंदर आणि क्लासी आहे, ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.

आता तिनं काळ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

नोराने बॉलिवूडमध्ये तसेच कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये बरेच काम केले आहे. सुरुवातीला, तिला काम करण्यात खूप अडचण होती. परंतु, तिने कधीही हार मानली नाही आणि नेहमीच कामासाठी कठोर परिश्रम केले. नोराच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक भाऊ आहे. आपल्या धमाकेदार आयटम साँग्समुळे तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्यामुळे तो आजही खूप लोकप्रिय आहे.