
‘टकाटक’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी हॉट आणि सुंदर अभिनेत्री प्रणाली भालेराव पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

याला कारण म्हणजे ‘टकाटक 2’. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांकडून ‘टकाटक 2’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. गेले अनेक दिवस या चित्रपटाचं शूटिंगही सुरु होतं.

‘टकाटक 2’ च्या चित्रिकरणा दरम्यान प्रणाली भालेराव ग्लॅमरस अवतारात प्रेक्षकांशी कनेक्ट होत आहे.

गोव्यात तिनं अनेक नवनवीन फोटोशूट केले आहेत. तिनं या फोटोशूटचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअरही केलेत. तिचे हे फोटो प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरत आहेत.

आता प्रणालीचं नवं आणि क्लासी फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिनं पिवळ्या रंगाची नेटची साडी परिधान केली आहे. सोबतच यावर तिनं एकदम हॉट आणि बॅकलेस ब्लाउज कॅरी केलं आहे.

प्रणाली या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.