
एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाने हा लूक ट्राय केला होता. या लूकमध्ये तिने पीच टोन आय मेकअप केला होता आणि तिने तिची हेअरस्टाईलही हायलाइट केली होती.

आलियाचा मांग टिका आणि बिंदी तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत. एवढेच नाही तर तिने न्यूड लिप कलर लावला आहे आणि चेहऱ्यावर ग्लोइंग मेकअपही केला आहे.

आलिया भट्ट तिच्या लूकवर नेहमी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी फॅशन समीक्षकांकडून अनेकदा प्रशंसा मिळवते. या लूकमध्ये तिने ओठांवर पीच कलरची लिपस्टिक लावली असून, तिने पेस्टल आय मेकअप केला आहे.

तुम्हालाही बेस्ट नाईट लुक हवा असेल तर आलियाची ही स्टाईल नक्की कॉपी करा. यामध्ये, ग्लोइंग त्वचेशिवाय, तिने डोळ्यांना हायलाईट केले आहे आणि पीच कलरची लिपस्टिक लावली आहे.

आलिया भट्टच्या या स्मोकी आय मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाईलला अधिक पसंती मिळाली आहे. ही स्टाईल करून तिने स्वतःला एक रेट्रो लूक दिला आहे.