
2022 मध्ये किरण आणि आमिर यांनी विभक्त होत असल्याची बातमी चाहत्यांना दिली. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. तर पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अभिनेत्याला मोठी रक्कम मोजावी लागली.

रिपोर्टनुसार, आमिर खान याने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देताना 50 कोटी रुपये पोटगी स्वरूपात देले. आमिर खान आणि रिना दत्ता यांचं नातं लग्नाच्या 16 वर्षांनंतर तुटलं. रिना हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याने किरण राव हिच्यासोबत लग्न केलं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर किरण आणि आमिर यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अशात 2022 मध्ये देखील त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आमिर खान आणि रिना दत्ता यांना एक मुलगा जुनैद आणि मुलगा आयरा आहे. तर किरण राव आणि आमिर खान यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव आझाद खान असं आहे.

आमिर खान याचं दोन्ही पत्नींसोबत घटस्फोट झालं आहे. पण कोणत्याही कार्यक्रमात आमिर खान याचे दोन्ही कुटुंब एकत्र येतात. एवढंच नाही तर, रिना दत्ता आणि किरण राव एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.