
अभिषेक बच्चन... आता जरी अभिषेकचं हिंदी सिनेसृष्टीत चांगलं नाव असलं तरी एका काळ होता जेव्हा त्याच्या सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवायचे. बिग बी अमिताभ यांचं नाव मागे असतानाही त्याचे सिनेमे चालत नसत.

हा काळ आहे, 2000 ते 2004 चा या काळात अभिषेक काम तर करत होता. पण त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. अभिषेकचे सिनेमे चालत नव्हते.

एका पाठोपाठ एक अभिषेकचे 16 सिनेमे फ्लॉप गेले. अभिषेकच्या नावापुढे फ्लॉप सिनेमांची लिस्ट होती. पण अशातच त्याच्याकडे एक सिनेमा आला.

2004 साली अभिषेककडे एक सुपरहिट सिनेमा आला. हा सिनेमा होता, धूम... धूम या सिनेमाने बजेट पेक्षा जास्त कमाई केली. धूम हा अभिषेकच्या करिअरमधला पहिला सुपरहिट चित्रपट होता.

यानंतर अभिषेकच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याच्याकडे चांगले सिनेमे येऊ लागले. आता बॉलिवूडमध्ये अभिषेकला वेगळी ओळख आहे. त्याचा वेगळा चाहता वर्ग आहे. आज अभिषेक त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करतो आहे.