
अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मीरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर मीरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील मीरा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मीरा हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. मीरा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

मीरा राजपूत फक्त शाहिद कपूर याची पत्नी असल्यामुळे चर्चेत नसते तर, सौंदर्य आणि फिटनेसमुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते. मीरा तिच्या वर्कआउटचे फोटो, व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मीरा पती शाहिद याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. शाहिद देखील सोशल मीडियवर पत्नीसोबत फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतो.