Bollywood Stars : बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार अभिनयातच नाही तर गायनातही आहेत अव्वल, पाहा सविस्तर

| Updated on: Jul 24, 2021 | 8:33 AM

अनेक अनेक कलाकार आहे जे उत्कृष्ट गायक देखील आहेत. (Bollywood Actors and Actress Are good Singers, See Details)

1 / 7
एखाद्या चित्रपटातील गाणी जर चांगली असतील तर चित्रपटाची हिट होण्याची शक्यता वाढते आणि जेव्हा त्या चित्रपटातील अभिनय करणाऱ्या कलाकारांनी गाणी गायली आहेत हे कळतं, तेव्हा ही शक्यता शंभर टक्क्यांपर्यंत वाढते, असं म्हटलं जातं. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा अभिनयही बळकट आहेत आणि आवाजही. हेच कारण आहे की काही चित्रपटांमध्ये या कलाकारांनी त्यांची गाणी स्वतः गायली आहेत. किशोर कुमार, सुलक्षणा पंडित असे अनेक कलाकार आहेत, जे केवळ स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही गाणी गात असत, तर आता बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे केवळ अभिनयातच नाही तर गाण्यातही परिपूर्ण आहेत. असे बरेच कलाकार आहेत ज्यांच्याबद्दल कोणालाही माहिती नसेल की ते उत्कृष्ट गायक देखील आहेत आणि त्यांच्या चित्रपटात स्वत:साठी गाणी गायली आहेत.

2 / 7
बॉलिवूडची गोंडस मुलगी आलिया भट्ट एक चांगली अभिनेत्री तसेच एक उत्तम गायिका आहे. तिनं स्वत: 'मैं तेन्नू समझावा' चं फीमेल व्हर्जन गायलं आहे आणि या गाण्यामुळेच लोकांना तिचा आवाज आवडू लागला आहे. यानंतर त्यांनी 'हायवे' आणि 'उडता पंजाब'मध्येही आवाज दिला आहे.

3 / 7
अनिल कपूर यांनी ‘चमेली की शादी’मध्ये एक गाणं गायलं होतं. हेमा सरदेसाई आणि सोनाली बेंद्रे यांच्यासोबत ते ‘हमारा दिल आपके पास हैं’ या चित्रपटातही गायले आहेत. गाण्यात अनिल कपूरचा आवाज खूप चांगला आहे.

4 / 7
फरहान अख्तर मल्टी टॅलेंटेड आहे. चित्रपट बनवण्यापासून ते अभिनय आणि गाण्यापर्यंतदेखील तो परिपूर्ण आहे. तुम्ही त्याचा आवाज 'रॉक ऑन' मध्ये ऐकला असेल. या चित्रपटाच्या यशानंतर फरहाननं मागे वळून पाहिलं नाही आणि इतर काही चित्रपटांमध्येही त्यानं आवाज दिला आहे.

5 / 7
बॉलिवूडच्या देसी गर्लनं केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पॉप गायन केलं आहे. तिनं पिटबुलसारख्या शीर्ष आंतरराष्ट्रीय गायकांसोबत काम केलं आहे आणि तीन पॉप गाणी सादर केली आहेत. 'मै तुम्हे प्यार नही कर सकता' हे तिचं नवीन गाणे आहे, तर यापूर्वी तिने 'मेरी कॉम' शिवाय 'दिल धड़कने दो' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकलाही आवाज दिला होता.

6 / 7
श्रद्धा कपूरनं स्वत:च्याच 'एक व्हिलन' चित्रपटात गायलं होतं आणि हे गाणं प्रचंड गाजलं होतं. ‘तेरी गलियान’मध्ये श्रद्धा महिला गायिका होती. यानंतर तिनं स्वत:ची सर्व गाणी 'रॉक ऑन 2' चित्रपटात गायली आहेत. चाहत्यांनाही तिचा आवाज चांगलाच आवडला आहे.

7 / 7
बॉलिवूड कलाकारांच्या क्लबमध्ये पार्श्वगायिका बनण्याची सोनाक्षी सिन्हाची नवीन एन्ट्री आहे. तिनं 'तेवर' चित्रपटाद्वारे गायनाची सुरुवात केली आणि त्यानंतर तिनं एक म्युझिक व्हिडीओही जारी केला.