
एका काळ असा होता जेव्हा काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

गेल्या अनेक वर्षांपासून काजोल बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील काजोलने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोपटी रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

काजोलचा साडीतील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आज काजोल सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.