
करीना कपूर ही बॉलिवूडची फॅशनेबल अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यचे लाखो चाहते आहेत. अनेक लोक तिला फॉलो करतात. पण तिची एक चाहती आहे शनाया सचदेव.

शनाया सचदेव ही करीनासारखी दिसते. लोक तिला करीना कपूरची ड्युप्लिकेट सुद्धा म्हणतात.

शनाया सचदेव एका रात्रभरात टिकटॉक स्टार बनली होती. करीनाच्या डायलॉग्सवर ती व्हिडीओ तयार करायची.

शनाया केवळ करीनाच्या संवादांवर व्हिडीओ तयार करायची हेच नाही तर ती करीना सारखी तयारही व्हायची.

शनायाची टिकटॉकवर चांगली फॅन फॉलोइंग होती. मात्र टिकटॉकवर बंदी आल्यानंतर ती गायब झाली.