
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. ९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते... पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो...

गुढीपाडवा असल्यामुळे मिरवणुकीत खास लूक करण्यासाठी तुम्ही माधुरी हिचे साडीतील काही लूक कॅरी करू शकता. ज्यामुळे तुमच्या सौंदर्याची देखील चर्चा होईल...

साडी, केसात गजरा, नाकात नथ, बांगड्या... या मराठमोळ्या अंदाजात तुमचं सौंदर्य देखील फुलून दिसेल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

माधुरी म्हणजे बॉलिवूडची 'धक धक गर्ल...' वयाच्या 55 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते आणि चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.