
वडिलांचा तिरस्कार करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री रेखा अव्वल स्थानी आहेत. रेखा यांनी वडिलांच्या शेवटच्या क्षणी देखील त्यांचं तोंड पाहिलं नाही. कारण त्यांनी कधी अभिनेत्रीला मुलीचा दर्जा आणि प्रेम दिलं नाही.

'बिग बॉस' फेम जिया शंकर देखील वडिलांसोबत राहात नाही. अभिनेत्रीच्या मनात वडिलांबद्दल फक्त राग आहे. असं देखील सांगितलं जातं. या कारणामुळे अभिनेत्री वडिलांच्या नावाचा देखील वापर करत नाही.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी लग्नाआधी मसाबा गुप्ता हिला जन्म दिला. मसाबा हिच्या वडिलांना संकट काळात साथ सोडली. त्यामुळे मसाबा देखील तिच्या आईचं नाव स्वतःच्या नावापुढे लावते.

श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी देखील वडिलांचा तिरस्कार करते. आई - वडिलांच्या घटस्फोटानंतर पलक आईसोबत राहाते. एवढंच नाहीतर, पलक तिच्या नावापुढे आईचं नाव लावते.

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचे देखील वडिलांसोबत वाद आहेत... असा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे.