
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. शिल्पा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

फिटनेस फ्रिक शिल्पा आजही प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांना फिटनेस टीप्स देत असते.

आजही शिल्पा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.