
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हटके अदांना चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'जगात लाल रंगाची सर्वात बेस्ट गोष्ट कोणती आहे...?' असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे.

अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.