
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चर्चेत आहे. लवकरच सोनाक्षीचा Double XL हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय. या चित्रपटासाठी सोनाक्षीने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते.

Double XL मध्ये सोनाक्षीसोबत हुमा कुरेशी देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय.

बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2022 च्या दुसऱ्या सीजनला सध्या सुरूवात झालीये. यावेळी सोनाक्षीचा अत्यंत मनमोहन लूक दिसून आला.

विशेष म्हणजे रॅम्प वॉकनंतर सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्रामवर याचे काही खास फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

सोनाक्षीचा हा खास लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडल्याचे दिसतंय. सोनाक्षीच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.