
अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर लग्नबंधनात अडकली आहे. रियानं 14 ऑगस्टला तिचा बॉयफ्रेंड करण बूलानीशी लग्न केलंय. रियाची बहीण सोनम कपूरनं लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बहिणीच्या लग्नात सोनम भावूक झालेली दिसली.

सोनमनं पती आनंद अहुजासोबत रियाच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सोनम भावूक झालेली दिसत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आहेत.

सोनमने बहीण रियासोबत एक फोटो शेअर करून खास संदेश दिला आहे. तिनं लिहिलं- आम्ही एकत्र असू किंवा दूर राहु मात्र आम्ही बहिणी मनापासून जोडलेल्या आहोत. या सुंदर वधूची बहीण असल्याचा मला अभिमान वाटतो. तुझ्यावर प्रेम आहे.

सोनमने जिजू करणसाठी लिहिलं - तू नेहमीच कुटुंब होतास. माझ्या मेहुण्याची पदवी मिळण्यापेक्षा आपली मैत्री जास्त महत्वाची आहे. तुझ्यावर प्रेम आहे.

लग्नात सोनम कपूरनं पेस्टल ग्रीन कलरचा सूट घातला होता. तिचा पारंपारिक लूक खूप पसंत केला जात आहे. सोनम साध्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती.

सोनम कपूरनं पती आनंदसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अनेक पोज देताना दिसत आहे.