
आलिया भट्टने हायवे, गंगूबाई काठियावाडी आणि राजी यांसारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका केलीयं. सध्या आलिया तिच्या डार्लिंग्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आलियाने नुकतेच सांगितले की, ती इंडस्ट्रीत अनेकदा ती लिंगवादाची शिकार झालीयं.

आलिया भट्टने एका मुलाखतीत सांगितले की, लोक महिलांनी काय करावे किंवा काय करू नये हे नेहमीच कसे सांगतात. आलिया पुढे म्हणाली की, मी स्वत: अनेकदा लिंगवादाची शिकार झालीयं.

आता मी पूर्वीपेक्षा जास्त संवेदनशील झाले आहे. बरेचदा माझे मित्र म्हणतात तुला काय झाले आहे, तू एवढी आक्रमक का आहेस? आलिया पुढे बोलताना म्हणाली की, बऱ्याच लोकांना असे वाटते की, जर महिलांची ब्रा दिसली तर जगासाठी धोका आहे.

गरोदरपणातही आलिया भट्ट दिसतेय किती सुंदर... तुम्हालाही हवीय तिच्यासारखी चमकणारी त्वचा; तर, फॉलो करा ‘या’ टिप्स!

लवकरच आलिया भट्ट आता आई होणार आहे. नुकताच आलियाच्या डार्लिंग्स चित्रपटाचे शुटिंग संपले आहे. आता आलियाचे चाहते तिच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.