
बॉलिवूडची जी अभिनेत्री भाड्याचे कपडे वापरते ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री झीनत अमान आहे. झीनत अमान यांनी त्यांच्या कपड्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र झीनत अमान यांच्या कपड्यांची चर्चा रंगली आहे.

झीनत अमान यांनी त्यांच्या कपड्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. झीनत अमान कोणत्याही लग्न सोहळ्यात किंवा कोणत्याही कार्यक्रमात जे कपडे घालतात ते भाड्याने घेतलेले असतात.

झीनत अमान यांनी त्यांच्या जीवनातील मोठं रहस्य तरुणांसोबत शेअर केलं आहे. जेणेकरून तरुण पिढी कपडे खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करणार नाही. झीनत अमान आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात.

झीनत अमान म्हणाल्या, 'मला भारतीय लग्नांमध्ये जायला प्रचंड आवडतं. ज्यासाठी मी कधीच नकार देत नाही...', पण लग्न सोहळ्यासाठी झीनत अमान कपडे खरेदी करत नाहीतर, भाड्याने घेतात.

रिपोर्ट्सनुसार, झीनत अमान यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांची नेटवर्थ २४० कोटी रुपये आहे. झीनत अमान कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. झीनत अमान यांनी याच वर्षी सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे.