
उद्योगपती राज कुंद्राकडे खूप संपत्ती आहे. यापैकी जुहूतला एक अलिशान फ्लॅट आपली पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर केला असल्याची माहिती आहे. Zapkey.com यांनी याविषयी माहिती दिली आहे.

Zapkey.com यांच्या रिपोर्टनुसार, राज कुंद्राचे 5 फ्लॅट आहेत. ज्यांचं नाव 'ओशियन व्यू' असं आहे. यातला 38.5 कोटी रूपये इतक्या किमतीचा एक फ्लॅट त्याने शिल्पाच्या नावावर केला आहे.

स्क्वायरफीट इंडिया डॉट कॉमचे संस्थापक वरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फ्लॅट 5 हजार 999 स्वेअर फूटचा आहे. 21 जानेवारी 2022 या फ्लॅटची कागदपत्रं रजिस्टर केली गेली आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा एकेकाळी सर्वाधिक चर्चेत असणारं जोडपं होतं. या दोघांची केमेस्ट्री अनेकांना आवडायची. पण मागच्या काही दिवसात या दोघांच्या अडचणी वाढल्या.

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राचं नाव पुढे आलं. त्याला काही दिवसांसाठी तुरूंगातही जावं लागलं. त्यामुळे शिल्पालाही मनस्ताप सहन करावा लागला. मात्र आता या प्रकरणातून हळूहळू सावरत असतानाच राजने शिल्पावर असलेलं प्रेम दाखवून दिलंय. त्याने 38.5 कोटी किमतीची फ्लॅट शिल्पाच्या नावे केला आहे.