
यंदा कलर्स टीव्हीवरील प्रसिध्द शो बिग बॉस 16 ची थीम अत्यंत खास आहे. बिग बॉस 16 च्या थीमचे काही फोटो व्हायरल होत असून बिग बॉस 16 चे घर एकदम जबरदस्त दिसत आहे.

बिग बॉस 16 ची थीम सर्कस असून यावेळी धमाल होणार हे नक्कीच आहे. बिग बॉसच्या दिग्दर्शकांनी यावेळी देखील सेटची सुंदर रचना केलीये.

सेटच्या बाहरेच्या परिसरात तुम्हाला एकदम सर्कस दिसणार आहे. स्पर्धकांसाठी जिम आणि पूल एरियासह गार्डन देण्यात आलय.

लिव्हिंग एरियामध्ये जाताच घराचा आतील भाग पूर्णपणे पुन्हा डिझाइन केला आहे. यंदाचे किचनही खास डिझाइन करण्यात आले आहे.

दरवेळीपेक्षा यंदा बिग बॉस 16 चा सेट पूर्णपणे वेगळा डिझाइन करण्यात आलाय. यावेळी बेडरूम देखील खास करण्यात आली असून यामध्येही मोठे बदल केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

यावेळी बिग बॉसने घराच्या कॅप्टनची बेडरूम अत्यंत खास तयार केलीये. या बेडरूममध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत.