
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे स्टाईल! तिच्या स्टाईलवर लाखो चाहते फिदा होतात. आता देखील सईच्या हटके अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

सई तिच्या इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. त्यातलाच हा बोल्स ड्रेसमधला हा एक फोटो आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सईचे वेगवेगळे लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सईचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सई कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर सईच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.