
सैराट चित्रपटातून एण्ट्री करत रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडणारी आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर कहर करतेय.

गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिच्या नव्या फोटोशूटचे हे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. एवढंच नाही तर रिंकु वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांच्या आपली जागा निर्माण करुनच आहे.

रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.

आता 2021 मध्ये रिंकु एका ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा सुद्धा झळकणार आहे. अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. त्यामुळे रिंकूसाठी हा चित्रपट प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे.