
सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडिया सक्रिय असते आणि प्रियकर नुपूर शिखरेसोबतचे तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. स्टार किड एक फिटनेस ट्रेनरला डेट करतेय. नुकतंच तिनं इन्स्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

हा असा ड्रामेबाज! # लव्ह # कडल्स # हॅपीपिल, असं कॅप्शन देत आयरा खानने हे फोटो शेअर केले आहेत.

आयरा खाननं या वर्षाच्या सुरूवातीच्या प्रॉमिस डेच्या निमित्तानं बॉयफ्रेंड नुपूर शिखरे या फिटनेस ट्रेनरबरोबर तिच्या नात्याला अधिकृत केलं होतं.

आमिर खानची मुलगी आयरानं आपण नैराश्यानं ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या भावना व्यक्त करते.

आयरा खान ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताकडून झालेली मुलगी असून त्याबरोबरच त्याला जुनैद नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.