

लग्नाच्या काही वर्षांनंतर दलजीत कौर आणि शालिन भनोट यांचा घटस्फोट झाला. आता दुसऱ्यांदा लग्न करण्यास दलजीत कौर ही तयार आहे. आज निखिल पटेल याच्यासोबत दलजीत कौर लग्न गाठ बांधणार आहे.

विशेष म्हणजे निखिल पटेल हा देखील दोन मुलांचा बाप आहे. निखिल पटेल हा अफ्रिका येथील नारोबी येथे राहतो. मात्र, काही दिवसांनी हे लंडनला शिफ्ट होणार आहेत. त्याचे लंडनला घर आहे.

दलजीत कौर ही लग्नानंतर नारोबी येथे राहण्यास जाणार आहे. दलजीत कौर हिच्यासोबत तिचा मुलगा देखील असेल. आता दलजीत कौर हिच्या हळदीमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

दलजीत कौर हिने तिच्या हळदीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दलजीत कौर हिचा लूक एकदम जबरदस्त आणि सुंदर दिसत आहे.