
सिडनाजची प्रसिद्ध जोडी अर्थात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला, या वीकेंडला कलर्स टीव्हीच्या डान्सिंग रिअॅलिटी शो 'डान्स दीवाने 3' मध्ये आपली जादू दाखवण्यासाठी हजेरी लावणार आहेत. हा आठवडा चाहत्यांसाठी खूप खास आहे, कारण बिग बॉस ओटीटीनंतर आता पुन्हा एकदा शहनाज आणि सिद्धार्थ प्रेक्षकांसमोर आपली रोमँटिक केमिस्ट्री घेऊन येतील.

कलर्स टीव्हीनं शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण सिडनाजला 'हम्मा हम्मा' गाण्यावर डान्स करताना बघितलं. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की निर्मात्यांनी सिद्धार्थ आणि शहनाजला एका लाल कपल खुर्चीवर बसवले आहे.

दोघांनाही जजने काही प्रश्न विचारले आहेत. शोची जज माधुरी दीक्षितनं दोघांनाही विचारले की तुमच्या दोघांच्या मते आदर्श जोडीदार कसा असावा. यावर सिद्धार्थनं नाही, मात्र शहनाजनं तिच्या मस्त स्टाईलमध्ये उत्तर दिलं.

शहनाज माधुरीला उत्तर देताना म्हणाली, 'माझ्यासाठी, मुलगा? मला तर हा आवडतो. 'शहनाजच्या तोंडून हे उत्तर ऐकून सिद्धार्थ डोक्यावर हात ठेवून हसू लागला. या निमित्तानं शहनाज तिचा आवडता मुलगा सिद्धार्थ नाही तर पियुष गुरभळेला किस करताना दिसणार आहे.

पियुषला डान्स दिवाने मध्ये पाहुणा म्हणून आलेल्या सिद्धार्थ शुक्लानं रोमान्स शिकवला होता.

आता जेव्हा त्याने शहनाजला पियुषच्या हाताला किस करताना पाहिलं, तेव्हा सिद्धार्थनं ईर्षेनं त्याला सांगितलं, 'मी तुला रोमान्स करायला शिकवलं आणि तू माझ्याच मैत्रिणीसोबत निघून गेला.'