प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचा संसार तुटला, नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासे, नवे लग्न…

खुद्द सपना चौधरीनेच मी माझा पती वीर साहू याच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सपना चौधरीने रितसर अर्जदेखील केला आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर वीर आणि सपना यांचा संसार तुटत आहे.

| Updated on: Nov 23, 2026 | 7:04 PM
1 / 5
हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरी हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. फक्त हरियाणाच नव्हे तर देशभरात तिचे चाहते आहेत. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान याच सपना चौधरीच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी माहिती समोर आलीय.

2 / 5

खुद्द सपना चौधरीनेच मी माझा पती वीर साहू याच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सपना चौधरीने रितसर अर्जदेखील केला आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर वीर आणि सपना यांचा संसार तुटत आहे.

3 / 5

या लग्नामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तसेच करिअरवर परिणाम पडला असं सपना चौधरीने म्हटलंय. सोबतच आमचं नातं तुटण्यामागचं कारण फक्त मला आणि माझ्या पतीलाच माहिती आहे, असं सूचक विधानही तिने केलंय.

4 / 5

आपल्या घटस्फोटावर भाष्य करताना तिने प्रेमभावनेविषयी आपलं मत मांडलंय. प्रेम हे फक्त शारीरिक नसतं. प्रेम हे भावनिकदेखील असतं. पुरुष प्रॅक्टिकली खूप विचार करतात. महिला मात्र भावनिक असतात, असं तिनं म्हटलंय.

5 / 5

दरम्यान सपना चौधरी आणि वीर साहू यांचा 2020 साली विवाह झाला होता. या दोघांना दोन मुलं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. आता त्यांचा घटस्फोट होत आहे. नवे लग्न करण्याचा सध्यातरी माझा विचार नाही, असंही तिने यावेळी स्पष्ट केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us