
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर सक्रिय राहू लागली आहे. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट शेअर करत असते. आता दीपिकानं तिचे काही लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे.

आज रणवीर सिंगच्या आईचा वाढदिवस आहे. या सेलिब्रेशनसाठी पादुकोण आणि भवनानी कौटुंबिक जेवणासाठी एकत्र आले आहेत. दीपिकानं सासूच्या वाढदिवसासाठी हा लूक कॅरी केला आहे.

दीपिका आणि रणवीर एकत्र दिसले. दीपिकासोबत रणवीर सिंगचा लूकही खूपच हटके होता. रणवीर सिंगनं डेनिमसह टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट कॅरी केलं होतं. तसेच, त्यानं टोपी आणि गॉगल्स कॅरी केले होते.

दीपिकाच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं काळ्या रंगाची पँट घातली आहे ज्यासोबत लाल लांब टॉप आहे. यासह तिनं लाईट मेक-अप केला आहे आणि बन बनवला आहे.

दीपिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहेत.

दोघांचे हे फोटो परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.