
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी चित्रपट 'गहराईयां'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री नुकतीच 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर पोहोचली होती.

दीपिकासोबत या चित्रपटात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. शकुन बत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

कपिलच्या शोमध्ये दीपिका पदुकोणने ब्लॅक बॉडी कॉन वेल्वेट ड्रेस परिधान केला होता. या आउटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

बॉडी कॉन ड्रेससह ग्लॅम मेकअप करीत दीपिकाने डोळ्यांना स्मोकी लूक दिला आहे. अभिनेत्रीने फोटोग्राफर्सना अनेक पोज दिल्या आहेत.

दीपिकाने ब्लॅक हिल्ससह ब्लॅक आउटफिट कॅरी केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.