
बॉलिवूड सेलेब्स मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा आनंद लुटत आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर. जान्हवीनं पावसाळ्याचा आनंद लुटताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत. जान्हवी या फोटोमध्ये डान्सिंग अंदाजात दिसत आहे.

जान्हवीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये जान्हवीनं ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे.

जान्हवीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. सारा अली खानसह अनेक सेलिब्रिटींना जान्हवीचे हे फोटो आवडले आहेत. हा फोटोला सुमारे 4 लाख लोकांनी लाईक केलं आहे.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे बॉलिवूड सेलेब्स घरातच राहून पावसाचा आनंद लुटत आहेत.

जान्हवी कपूरला पेन्टिंग खूप आवडते. नुकतंच तिनं एक चित्र काढताना आपला फोटो शेअर केला होता. जान्हवीची पेंटिंग तिच्या चाहत्यांना खूप आवडली होती.