
ईशा देओल हिची जुनी मुलाखत सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत अभिनेत्री विवाहबाह्य संबंधांवर मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत ईशा म्हणाली 'प्रेम-प्रेम असतं, त्याला दोष देता येत नाही.' विवाहबाह्य संबंधांवर मला काहीही हरकत नाही.. असं देखील ईशा म्हणाली होती.

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील एका विवाहित पुरुषावर प्रेम केलं होतं. ईशा हिच्यानुसार, ती स्वतःचे विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. 'मी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडती तर, त्यावर माझं नियंत्रण नसेल...' असं देखील ईशा म्हणाली होती.

गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पती भरत तख्तानी याचे अफेयर असल्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. भरत आणि ईशा यांना दोन मुली आहेत. ईशा कायम मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

ईशा देओल हिने लग्नानंतर बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ईशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र ईशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.