
आज प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत. बॉलिवूड सेलेब्सनंही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं. तैमूरनं स्वतः मातीपासून लहान गणपती बनवला आहे.

अनन्या पांडेनं तिच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं.

तुषार कपूरनं आपल्या मुलासह गणपती बाप्पाची पूजा केली. यावेळी दोघंही पारंपरिक लूकमध्ये दिसले.

सलमान खानची बहीण अर्पितानंसुद्धा बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं ज्यामध्ये तिचे अनेक मित्र उपस्थित होते.

जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख देखील गणपती उत्सवासाठी अर्पिताच्या घरी पोहोचले होते.

टी-सीरिजनं उत्तम गणेशोत्सव साजरा केला. दिव्या खोसला कुमार बाप्पाची पूजा करताना दिसली.