
अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांचं कुटुंब बॉलिवूडशी संबंधित नाही, मात्र त्यांचं कुटुंब इतर क्षेत्रात प्रसिद्ध आहे. या अभिनेत्री काही वेगवेगळ्या राज्यांतून आल्या आहेत ज्यांनी बी-टाऊनमध्ये आपली जादू दाखवली. अशीच एक अभिनेत्री आहे नेहा शर्मा. नेहा शर्मा एका राजकीय कुटुंबातून आली आहे. आम्ही तुम्हाला नेहा शर्माबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे बिहारचे आहेत आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावत आहेत. नेहा बिहारमधील भागलपूर येथून मायानगरीत आली आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली. नेहा (Neha Sharma) बिहारच्या एका सुप्रसिद्ध कुटुंबातून आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा बिहारचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची मुलगी आहे. अजित शर्मा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले होते. निवडणूक प्रचार आणि रॅली दरम्यान नेहा तिच्या वडिलांसोबत दिसते. नेहाने वडिलांसोबत अनेक निवडणूक दौरे केले आहेत.

2007 मध्ये नेहानं तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगु चित्रपट 'चिरुथा' पासून केली. नेहानं बॉलीवूडमध्ये 'क्रूक' चित्रपटाद्वारे प्रवेश केला. या चित्रपटात ती इमरान हाश्मीसोबत दिसली. नेहाला या चित्रपटात चांगलीच पसंती मिळाली आणि ती लगेच प्रसिद्धीच्या झोतात आली.

गेल्या वर्षी नेहा शर्मा 'बिग बॉस 13' विजेता सिद्धार्थ शुक्लासोबत दिसली होती. दोघांनी एकत्र म्युझिक व्हिडीओ केला. लोकांना दोघांची केमिस्ट्री आवडली. तिचं गाणं हिट रोमँटिक नंबर होतं.

नेहा अजय देवगण स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'तान्हा जी: द अनसंग वॉरियर' मध्येही दिसली होती. नेहा या चित्रपटात कमला देवीच्या भूमिकेत दिसली. नेहाची भूमिका छोटी होती, मात्र या छोट्या भूमिकेतही ती अपील करत होती. लोकांनी तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक केलं.

नेहा शर्मा ट्रेंड कथक डान्सर आहे. अजून, तिला चित्रपटांमध्ये तिचा आश्चर्यकारक डान्स दाखवण्याची संधी मिळाली नाही.