
अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. गौरी खानचं नाव तिच्या कामासाठी ओळखलं जातं आणि शाहरुख खानमुळे नाही. गौरी एक सुप्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आहे. गौरी खान आज तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.

गौरी खान दिल्लीची आहे. तिच्या कौटुंबातील अनेकजण लष्करातील आहेत. गौरीचे वडील रमेशचंद्र छिब्बर कर्नल होते.

गौरीचे शिक्षण दिल्लीतून झालं आहे. गौरीने लेडी श्री राम कॉलेज, सोबतच तिने दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदवी प्राप्त केली आहे.

गौरी शाहरुखला दिल्लीत भेटली. शाहरुखसोबत डेटवर जाण्यासाठी गौरी अनेकदा शाळेच्या भिंतीवर चढत असे. तिने आपल्या एका मुलाखतीतही हे सांगितलं होतं.

ग्लॅमरच्या बाबतीत गौरी बी-टाऊनच्या कलाकारांपेक्षा कमी नाही. गौरीची स्टाईल आणि तिच्या फॅशन स्टेटमेंटसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही मागे आहेत. तीन मुलांची आई असूनही गौरीने स्वतःला खूप चांगले सांभाळलं आहे. गौरी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते, जे पाहून तिच्या चाहत्यांचं म्हणणे आहे की ती बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह (Aryan Khan) आठ तरुणांना अटक झाली. मात्र या आरोपींच्या कुटुंबीयांकडून पोरांचे लाडकोड अजूनही सुरु असल्याचं दिसलं. आरोपींसाठी कुटुंबीय मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं होतं.