
अभिनेत्री मौनी रॉयनं आपल्या धमाकेदार अभिनयातून स्वत:ला सिद्ध केलं आहे. मौनी तिच्या चाहत्यांमध्ये बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. नुकतंच चाहत्यांच्या मनावर राज्य करणार्या मौनीनं त्यांच्यासाठी काही खास फोटो शेअर केले आहेत.

मौनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. नुकतंच तिनं बॅकलेस आउटफिटमध्ये फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ केलं आहे.

मौनीनं ब्लू आणि ब्लॅक कलरच्या जंप सूटमध्ये हॉट स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2006 मध्ये मौनी रॉयनं आपल्या करिअरची सुरूवात 'क्युन्की सास भी कभी बहुत थी' या मालिकेद्वारे केली होती. या शोनंतर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

मौनी रॉयनं अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता मौनी लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.

इन्स्टाग्रामवर मौनीचे 17 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.