
'बिग बॉस मराठी' सिझन 5

शोच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. बिग बॉस मराठीचा Grand Finale होणार आहे धमाकेदार.. मग, आजच तुमचं कॅलेंडर बुक करून ठेवा! असं कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलं आहे.

'बिग बॉस' मराठीचा Grand Finale, 6 ऑक्टोबर, संध्या. 6 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema पाहता येणार आहे.

शर्यतीत धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोशल मीडियावर देखील सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस मराठी 5' ची चर्चा रंगली आहे. आता टॉप 6 स्पर्धकांबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.