
आज साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांची धाकटी मुलगी अक्षरा हसनचा वाढदिवस आहे. अक्षराचा जन्म 12 ऑक्टोबर 1991 रोजी चेन्नई येथे झाला. चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणाऱ्या अक्षराने चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शनही केलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 'शमिताभ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दक्षिण अभिनेत्री अक्षरा हसन आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षरा हसनने बॉलिवूडमध्ये तिचा दुसरा चित्रपट 'लाली की शादी में लड्डू दिवाना' केला आणि त्यानंतर ती कॉलीवुडमध्ये पोहोचली. येथे तिने अजित कुमारसारख्या सुपरस्टारसोबत 'विवेगम' चित्रपटात काम केलं. अमिताभसोबत डेब्यू केल्यानंतरही अक्षराला फारसं यश मिळालं नाही.

अक्षरा हासनचे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले होते. या फोटोंमध्ये अक्षरा अंडरगर्मेंटमध्ये सेल्फी घेताना दिसली. या घटनेने तिला खूप भीती वाटली. अक्षराचे खासगी फोटो लीक झाल्यानंतर तिचा माजी बॉयफ्रेंड आणि रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी हे चौकशीच्या कक्षेत आले.

स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्या अक्षरा हासनने 2017 मध्ये आपला धर्म बदलला. अक्षराने हिंदुत्व सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता. धर्मांतराबाबत अक्षरा म्हणाली की तिने स्वतः बौद्ध धर्मावर विश्वास ठेवून हे पाऊल उचललं.

अक्षराने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अक्षराने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या. ती एक उत्तम अभिनेत्री तसेच पटकथा लेखक आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री सारिकाची मुलगी आहे. अक्षरा हासनची एक मोठी बहीण आहे- श्रुती हासन. श्रुती हासन एक बॉलिवूड आणि टॉलीवूड अभिनेत्री आहे.