
अभिनेत्री रियाने 1991 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. रिया ही देव वर्मा आणि मुन मुन सेन यांची मुलगी आहे. विशेष म्हणजे रिया ही राजघराण्याशी संबंधीत आहे. (फोटो क्रेडिट्स: रिया सेन इंस्टाग्राम)

रिया सेनचे वडील देव वर्मा हे इला देवी यांचे पुत्र होते. इला देवी या राणी होत्या. मग यानुसार रिया देखील राज घराण्याशी संबंधीत आहे.

रियाने 2000 मध्ये स्टाईल या चित्रपटातून पुन्हा चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. रियाने बोल्ड स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली.

रियाने हिंदीशिवाय बंगाली, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिया 2020 मध्ये पति, पत्नी और वो मध्ये दिसली होती.

रिया तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील नेहमीच खूप चर्चेत असते. क्रिकेटर श्रीशांत, अश्मित पटेल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींसोबत तिचे नाव जोडले गेले आहे.