
बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायक बनून प्रेक्षकांना घाबरवणारे पंकज धीर (Pankaj Dheer) आजही महाभारतातील ‘कर्ण’ या पात्रासाठी ओळखले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, पंकज यांना याआधी कर्णाची भूमिका करायची नव्हती.

पंकज धीर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना आधी कृष्ण किंवा अर्जुनची भूमिका करायची होती, कारण त्यांना बाकीच्या पात्रांबद्दल फारशी माहिती नव्हती. अर्जुन आणि कृष्ण हीच महत्त्वाची पात्रं आहेत, असं त्यांना वाटत होतं.

यानंतर बीआर चोप्रांनी त्यांना कर्णाच्या पात्राचे महत्त्व सांगितले. पंकजला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नसला, तरी बीआर चोप्रा यांनी त्यांना कर्णावर लिहिलेली पुस्तके वाचायला दिली.

पुस्तके वाचून पंकज यांना खात्री पटली की, कर्ण हा एक महान योद्धा आहे. हे पात्र उत्तम साकारण्यासाठी पंकज यांनी पुन्हा भरपूर मेहनत घेतली आणि याचा पुरावा तुम्हाला महाभारतात पाहायला मिळेल.

पंकज बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहेत आणि ते शेवटची वेब सीरीज ‘पॉयझन’मध्ये दिसले होते. यामध्ये पंकज यांनी बॅरिस्टर डी कोस्टा यांची भूमिका साकारली होती. तेव्हापासून पंकज चित्रपट किंवा टीव्ही शोपासून दूर आहे.