
बिग बॉस 14 ची विजेती अभिनेत्री रुबीना दिलैक टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती टीव्हीची पहिली अभिनेत्री आहे जिने किन्नर सूनेचं पात्र साकारण्याचं धाडस दाखवलं. लोकांनी तिच्या पात्रावर खूप प्रेम केलं.

वास्तविक जीवनातही रुबीनाला नेहमी सत्याचं समर्थन करायला आवडते. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या रुबीनाला बिग बॉसच्या घरातल्या लोकांनी खूप पसंत दिलं.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रुबीना दिलैक बिग बॉसच्या शेवटच्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तिनं पती अभिनवसोबत शोमध्ये प्रवेश केला.

रुबीना एक इंटिरियर डिझायनर देखील आहे. ती तिच्या फिटनेस आणि फॅशनकडेही खूप लक्ष देते.

बिग बॉसच्या घरात तिनं परिधान केलेले कपडे फॅशन स्टेटमेंट बनले. यूके स्थित इस्टर्न आय या वृत्तपत्रानं टॉप 50 सेक्सिएस्ट आशियाई महिलांच्या यादीत रुबीना दिलैक 26 व्या क्रमांकावर होती.

गेली 13 वर्षे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवलेली ही 34 वर्षीय अभिनेत्री लवकरच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार आहे.