
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हसीन जहां इन्स्टाग्रामवर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून हेडलाईन्समध्ये राहते. हसीन जहाँ तिच्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून इंटरनेटवर कहर उडवत आहे.

हसीन जहाँ एक व्यावसायिक मॉडेल आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर देखील बनली आहे. हसीन जहाँ तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. सोशल मीडियावर अनेक लोक हसीन जहाँला फॉलो करतात.

मोहम्मद शमीने 6 जून 2014 रोजी कोलकाताची मॉडेल हसीन जहाँशी लग्न केलं. हसीन एक मॉडेल होती. मग ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर बनली. या दरम्यान दोघांची भेट झाली आणि दोघांनाहा एकमेकांवर प्रेम झालं. मग शमीने कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं. 17 जुलै 2015 रोजी शमी मुलीचा पिताही झाला.

मोहम्मद शमीशी झालेल्या वादामुळे हसीन जहाँ बऱ्याच काळापासून आपल्या मुलीसोबत वेगळे राहत आहे. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. अद्याप दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँचे लग्न 7 एप्रिल 2014 रोजी झालं होतं. काही वर्षांनंतर शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता, तसेच हसीननं शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत. 2018 मध्ये मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नी हसीन जहाँने हल्ला, बलात्कार, खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. आयपीसीच्या कलम 498 ए (हुंडा छळ) आणि कलम 354 (लैंगिक छळ) अंतर्गत शमीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर त्याचा भाऊ हसीद अहमदवर कलम 354 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.