
मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

आता शालूनं लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. शालू या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

राजेश्वरी खरातच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

राजेश्वरी खरातच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते.