
कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरवर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच सुनीलला स्पॉट केलं गेलं.

सुनील ग्रोव्हर बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी दिसला नव्हता. आज त्याला पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर स्पॉट केलं गेलं.

शस्त्रक्रियेनंतर तो पहिल्यांदाच दिसल्याने माध्यमप्रतिनिधींनी त्याला त्याच्या तब्येतीविषयी विचारलं. तेव्हा "मी बरा आहे. पुर्वीपेक्षा आता माझी तब्येत चांगली आहे. हळूहळू सुधारणा होतेय", असं सुनील म्हणाला.

कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्समधून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

सुनिलची 'सनफ्लावर' नावाची वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लवकरच त्याचा एक सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.