
माधुरी दीक्षित, मानव कौल, संजय कपूर, लखबीर सरन आणि मुस्कान जाफरी हे कपिल शर्माच्या येणाऱ्या रविवारच्या खास एपिसोडमध्ये दिसत आहेत.

कपिलच्या शोमध्ये हे सर्व कलाकार खूप धमाल करताना दिसणार आहेत. यादरम्यान माधुरीने सांगितले की, मानव शूटिंगदरम्यान तिला कशाप्रकारे हसवण्याचा प्रयत्न करतो.

कपिलने 'पहला पहला प्यार है' हे गाणे म्हणून माधुरीचे स्वागत केले. संजयने लव्ह यू राजा आणि अखियां मिलाओं कभी अखियों चुराँ गाण्यांवर 90 च्या दशकातील त्याच्या सुपरहिट मूव्ह्सच्या आठवणी ताज्या केल्या.

वकील म्हणून किकू शारदा, जग्गू दादाच्या भूमिकेत कृष्णा अभिषेक आणि चुन्नी बाबू आणि देव बाबूच्या भूमिकेत चंदन हे या रविवारच्या एपिसोडमध्ये पोटधरून हसायला लावणार आहेत.

विशेष म्हणजे कपिलने माधुरी दीक्षितसोबत डान्सही केला. इतकेच नाहीतर धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पाहून कॉमेडियन कपिल शर्माही माधुरीसोबत सेल्फी घेण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.