
दंगल हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. या सिनेमातील हा सिनेमा दोन बहिणींच्या आयुष्यावर आधारित आहे.त्यांचं नाव आहे, गीता आणि बबिता फोगट. यापैकी बबिता फोगट हे नाव वारंवार चर्चेत असते. तिच्या विषयी जाणून घेऊयात...

बबिता फोगट सध्या कंगना रनौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. पण याआधीही तिचा प्रवास खूप रंजक राहिला आहे. बबिता ही एक कुस्तीपटू आहे. तिने कॉमन वेल्थ गेम्समध्ये रौप्य पदके मिळवलं. तसंच जागतिक कुस्ती स्पर्धा कांस्य पदक मिळवलं.

त्यानंतर तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या अनेक प्रचार रॅलींमध्ये ती स्टार प्रचारक म्हणून उतरली होती.

आता ती सध्या कंगना रनौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये तिची पूनमसोबत जोडी आहे.

बबिताचा हा प्रावास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिने मेडल जिंकल्यानंतर सगळ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.