
देशात कंगना रनौतच्या चाहत्यांची कमतरता नाहीये. मात्र तिच्या चाहत्यांच्या यादीत 9 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे, महत्त्वाचं म्हणजे ही चिमुकली अगदी कंगनासारखीच दिसते.

सोशल मीडियावर या मुलीचे नाव छोटी कंगना म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र तिचं खरं नाव सुमन पुरी आहे.

सुमन बऱ्याचदा कंगनाच्या लेटेस्ट लूकची कॉपी करते आणि सोशल मीडियावर शेअर करते. सुमन सुद्धा थोडी कंगनासारखी दिसते आहे.

यावेळी कंगनासोबतच सुमनचा थलायवी लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या लूकमध्ये सुमनला पाहून तुम्हाला वाटेल की हा कंगनाचा बालपणीचा फोटो आहे, जो आता व्हायरल होत आहे.

सुमनचे फोटो तुम्हाला कंगनाच्या लहानपणासारखे वाटतील. ही छोटी कंगना मोठी कंगनाची मोठी चाहती आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुमन तिची आयडल कंगना रानौतला भेटली आहे. सुमन ‘मे’मध्ये कंगनाला भेटली होती आणि त्यानंतर तिनं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून स्वतःचा आणि कंगनाचा एक फोटोही शेअर केला होता.