

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे. १०० ते १५० पाहुण्यांनी या विवाहसोहळ्यास उपस्थिती लावली होती.

या विवाहसोहळ्यात नो फोन पाॅलिशी फाॅलो करण्यात आली होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता विवाहसोहळ्याला उपस्थित असलेल्यांनी देखील फोटो शेअर करण्यास सुरूवात केलीये.

चुही चावलानंतर आता करण जोहर याने देखील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नातील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करणचा लूक जबरदस्त दिसत आहे.

करण जोहर याच्या फोटोमध्ये शाहिद कपूर आणि त्याची पत्नी देखील दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये करण जोहर याच्यासोबत प्रोड्यूसर अमृतपाल सिंह बिंद्रा देखील दिसत आहेत.